संतोष रोकडे/अर्जुनी मोरगाव,दि.08ः तालुक्यातील केशोर पोलीस स्टेशनच्यावतीने कोरोना संसर्गाची माहिती देण्यासाठी परिसरातील गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली.पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधिक्षक (देवरी कँप) अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे नवनियुक्त ठानेदार बाबु एस मुंडे यांनी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव अधिक होवु नये या करीता कोरोना रोगाबाबद जनजागृती निमीत्य पोलीस पथकासह केशोरी व परिसरातील सर्व दुकानदारांना दुकाना समोर मार्कींग करने, सॉनिटायझरचा वापर करने, पाणी व साबण नियमित दुकाना समोर ठेवावे,05 पेक्षा अधिक व्यक्ति दुकानासमोर गर्दी करणार नाहीत अशा सुचना दिल्या. मास्क शिवाय कोणीही रस्त्यावर फिरणार नाही अन्यथा कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल तसेच अवैध धंदे चालवणाऱ्यांवरक कारवाई करण्याच्या सुचना बिट अंमलदार यांना दिल्या.