अर्जुनी मोरगाव,दि.09ःजिद्द,चिकाटी आणि सातत्त्य या त्रिसूत्रीचा वापर करा.ध्येय निश्चित करून प्रयत्नाची पराकाष्ठा करा यश तुमच्या पाठीमागे धावेल.तुमच्या मनातील लक्ष गाठा.तुम्हाला आवडते त्या क्षेत्रात करिअर करा.मोठे व्हा,पण ज्या मातीने,ज्या सामाजाने तुम्हाला साथ दिली.त्यांचे ऋण फेडण्याचे प्रतिपादन सहकार अधिकारी प्रशांत गाडे यांनी केले.
ते तालुका स्तरीय कुणबी समाज संघटनेच्या वतीने शिवरेशीडेन्सी येथे आयोजित गुणवणतांच्या सत्कार समारंभात उद्धघाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू तुकोबाराय,छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमापुजन आणि माल्यार्पनाणे झाली.पतीराम मुनेशवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात संघटना अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे, देविदास ब्राम्हणकर उपस्थित होते.
समाजातील दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र,स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन डॉ.दीपक रहिले,प्रास्ताविक अनिरुद्ध ढोरे,आभार गिरीश बागडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी धनराज रहिले,प्रा.अजय राऊत,संपत कठाने,उद्धव मेहंदळे यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनो मोठे होऊन समाजाचे ऋण फेडा-प्रशांत गाडे
..कुणबी समाज संघटनेचे वतीने गुणवंतांचा सत्कार