देवरी(सुरेश भदाडे)दि.१०- राज्यातील नगरपंचायतीचा कार्यकाळ 1 नोव्हेंबरला संपला अशा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रकियेला सुरवात झाली आहे.त्यामध्ये जिल्हातील ५ नगर पंचायतीचा कार्यकाळ संपल्याने त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज(दि.10)आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोग्याच्या निर्देशानुसार काढण्यात आली. देवरी येथे निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार तहसिलदारांच्या प्रमुख उपस्थितीत देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी आरक्षण सोडत काढली.या सोडतीवर हरकती व सूचना २६ डिसेंबरपर्यंत , प्रभाग रचना १८ नोव्हेंबर पर्यन्त , ४ डिसेंबर पर्यंत प्राप्त हरकती व सूचनांची सुनावणी करुन १० डिसेंबर पर्यंत विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकारी अभिप्रायासह अहवाल पाठविणार,आयुक्तांच्या परवानगीनंतर २४ डिसेंबर पर्यंत नगर पंचायत अधिनियमनुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक आरक्षण प्रवर्ग
प्रभाग क्रमांक -१ अनुसूचीत जमाती (महिला )
प्रभाग क्रमांक -२ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक -३ ना. मा . प्र . (ओबीसी ) महिला
प्रभाग क्रमांक -४ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -५ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक -६ अनुसूचीत जमाती
प्रभाग क्रमांक -७ ना. मा . प्र . (ओबीसी )
प्रभाग क्रमांक -८ ना. मा . प्र . (ओबीसी )
प्रभाग क्रमांक -९ अनुसूचीत जाती (एससी ) महिला
प्रभाग क्रमांक -१० ना. मा . प्र . (महिला )
प्रभाग क्रमांक -११ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -१२ अनुसूचीत जाती (एससी )
प्रभाग क्रमांक -१३ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -१४ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक -१५ ना. मा . प्र . (महिला )
प्रभाग क्रमांक -१६ अनुसूचीत जमाती (एसटी) महिला
प्रभाग क्रमांक -१७ अनुसूचीत जाती