जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केली;जलशुद्धीकरण केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी

0
98

वाशिम, दि. १२ : नगरपरिषदेच्या हिंगोली रोडवरील जलशुद्धीकरण केंद्राची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज पाहणी केली. तसेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विषयक कामकाजाची माहिती घेतली. निमजगा येथील नगरपरिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे, शहर अभियंता अशोक अग्रवाल, उपअभियंता विजय घुगरे, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र बढेल, कनिष्ठ अभियंता पंकज सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी वाशिम शहराला सध्या होत असलेला पाणीपुरवठा व त्याचे शुद्धीकरण प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये सांडपाण्यावर होत असलेल्या  प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.