अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

0
103

भंडारा दि.13: सणासुदीच्या काळात अन्न व खाद्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील खाद्यतेल विक्रेते, मिठाई व खवा विक्रेत्यावर धाडी घालून अन्न व औषध प्रशासन विभागाने 19 लाख 22 हजार 429 रुपये किंमतीच्या सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे. अन्य विक्रेत्यावरही या मोहिमेत कारवाई करण्यात आली.

दिवाळी सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासन, भंडारा कार्यालयाची धडक कारवाई दिवाळी सणानिमित्त खादय पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन, भंडारा व गोंदिया कार्यालयातर्फे विशेष धडक मोहीम राबवून खादय तेल रिपॅक करणारे विक्रेते, मिठाई, खवा विक्रेते ईत्यादी पेढयांवर धाडी घालून एकूण सहा खादयतेल रिपॅकर्स पेढयांकडून एकूण किलो १७,५२३.८ रिफाईड सोयाबीन तेलाचा साठा ज्याची बाजारभाव किंमत 19 लाख 22 हजार 429 रुपये  ईतकी आहे. में . गुरुनानक आईल मिल, माताटोली रोड ,गोंदिया. मे. भगत कंवरराम ऑईल इंडस्ट्रीज, पिंडकेपार रोड, गोंदिया. मे. शीव ऑईल मिल, मुर्री रोड, गोंदिया. मे .गुरुनानक तेल भांडार, गौशाला बार्ड, गोंदिया. में. के. जी . एन . ट्रेडर्स, लाखनी, जि. भंडारा .मे. ए.वाय.ऑईल पॅकर्स, मेन रोड , गडेगाव, ता. लाखनी, जि. भंडारा. यांचे कडून खादय तेल रिपॅक करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या टिनांच्या डब्यांचा पुर्नवापर होत असल्याने अन्न सुरक्षा व मानदे कायदयाच्या तरतुदी अंतर्गत जन स्वास्थ च सुरक्षेच्या कारणास्तव खादय तेलाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच लाखनी, जि. भंडारा येथील दोन खादय तेल रिपॅकर्सकडे कायदयाच्या तरतुदी अंतर्गत स्वत: ची स्वतंत्र व सुसज्ज प्रयोगशाळा नसल्याने सदर पेढयांना प्रयोगशाळा स्थापन करेपर्यंत खादय तेलाची विक्री तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. में . सदगुरु अनाज भंडार, दुर्गा चौक गोंदिया या पेढितून भेसळीच्या संशयावरुन एकूण 98कीलो. किंमत रु. 6 हजार 860 रुपये वटाणा पावडर चा साठा जप्त करण्यात आला तसेच मे. बावनथडे खोवा विक्री केंद्र, रामनगर, गोंदिया येथे एकूण 148 कीलो, किंमत 20 हजार 720 रुपये मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. सणासुदीच्या काळात विशेष मोहीमे अंतर्गत एकूण 49 विविध अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. विश्लेषन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्याच्या तरतुदी अंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

ग्राहकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, अन्नपदार्थाबाबत संशय असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन, भंडारा या कार्यालयास दूरध्वनी क्रमांक 07184-252461 यावर संपर्क साधावा. सदर कार्यवाही नागपूर विभागाचे सह आयुक्त सी. बी. पवार यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अ.प्र. देशपांडे यांचे नेत्वृत्वात, अन्न सुरक्षा अधिकारी बी. जी. नंदनवार, पी. व्ही. मानवतकर व श्रीमती देशपांडे यांचे समावेत करण्यात आली.