मरारटोली व संजयनगर येथे गोवर्धन पुजा थाटात

0
89
गोंदिया : यंदा कोरोना विषाणूच्या सावटात दिवाळी सण साजरा करण्यात आल. दिवाळीच्या  दुसºया दिवशी गोवर्धन पुजनाची परंपरा आहे. त्यानुरून शहरातील संजयनगर व मरारटोली येथे काल (ता.१५) आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र्र शाखा गोंदियाच्या वतीने गोवर्धन पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात आदिवासी गोवारी समाज बांधवांनी सहभाग घेत गोवर्धन पुजा थाटात साजरी केली.
कोरोना विषाणू संकट काळात गोवारी बांधवांनी हजारो वर्षाची परंपरा कायम ठेवत गायगोदन (गोवर्धन पुजन) साजरा केला. दिवाळी सणाच्या दुसºया दिवशी गावातील आखरावर गोवर्धन पुजा केली जाते. त्यानुरूप नजिकच्या मरारटोली व संजयनगर येथे आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र्र शाखा गोंदियाचे अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या मार्गदर्शनात गोवर्धन पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला दिपक नेवारे, प्रेमलाल शहारे, राजु सहारे, बबलु टागसे, सुनिल राऊत, नरेश नेवारे, राजेश आंबेडारे, पुनाराम सहारे, प्रेमलाल सहारे, राजू नेवारे, जगदिश शेंदरे, गुलाब नेवारे, डि.टी.चौधरी, विजु भोयर, प्रमोद शहारे, सुनिल राऊत, प्रभु काळसर्पे, रमेश नेवारे, महेश शहारे, हेमलाल वाघाडे, ऋषिकांत कोहळे, शिवलाल नेवारे, रेखलाल राऊत आदिवासी गोंड गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी परंपरेनुसार गोवर्धन पुजन करून गायी खेळविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.  कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.