गोंदिया : दिवाळीच्या पावनपर्वावर सुर्याटोला येथील युवकांनी पुढाकार घेत रविवारी (ता.15) परिसरात वृक्षारोपण केले.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राज्यभर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेमधून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. पर्यावरण संतुलित राहावे याकरिता सुर्याटोला येथील युवकांनी पुढाकार घेतला असून दिवाळीनिमित्त त्यांनी परिसरातील वृक्षारोपण केले. यावेळी केवल चिखलोंडे, दीपक भगत, इश्वर चिखलोंडे, राहुल गौतम, अभिषेक गौतम, अनुप गौतम, अनिकेत गौतम, राम गौतम, यश गौतम, कार्तीक गौतम, प्रथम ठाकूर, गुड्डू सोतवानी, मनिष चौधरी, दीपक रिनायत, नितीन चौधरी, गिरधारी गौतम आदी उपस्थित होते.