
अर्जुनी मोरगाव,-येथील गणेश नगर प्रभाग चार च्या माजी सरपंच कांता पाऊलझगडे यांच्या अंगणात सायंकाळी सात वाजता दरम्यान साप आढळून आला.सर्पमित्र राहुल लाडे यांना प्राचरण करण्यात आले.
स्थानिक सर्प मित्र राहुल लाडेयांनी त्या सापाला पकडले.सदर साप हा तस्कर जातीचा असून तो तीन फूट लांबीचा असल्याची माहिती लाडे यांनी दिली.
तस्कर (शास्त्रीय नावःElaphe helena)हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्या चौकोनांनी भरलेले असतात.
साप हा मानवाचा शत्रू नसून तो मित्र आहे.पर्यावरणाचा रक्षक आहे.परीसरात कुठेही साप आढळून आल्यास मला माहिती द्यावी असे आवाहन सर्पमित्र राहूल लाडे यांनी केले आहे.लाडे यांनी आजवर विषारी,बिनविषारी अश्या शेकडोंच्या वर सापांना पकडून जीवदान दिले आहे.या सापाला सुकडी जंगल शिवारात सोडण्यात आले. यावेळी राजू शिवणकर उपस्थित होते.