ओबीसींचा लढा तीव्र करण्याची गरज – अँड. अंजली साळवे

0
112

चंद्रपूर-राष्ट्रीय ओबीसी जात प्रवर्ग दर्शविणारा रकाना असावा तरच ओबीसी समाज येत्या जनगणनेत सहभागी होईल. ओबीसी जनगणना व्हावी या अनुषंगाने ‘ओबीसी का एलान पाटी लगाओ’अभियान सुरू केले आहे. यासाठी आपण न्यायालयीन लढा दिला आहे. ओबीसींचा लढा तीव्र करण्याची गरज आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अँड. अंजली साळवे यांनी केले. राजुरा तालुका ओबीसी समन्वय समितीतर्फे सभा धनोजे कुणबी सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ओबीसी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत संतोष देरकर, साईनाथ परसुटकर, सुभाष अडवे, विवेक खुटेमाटे, चापले, उमेश पारखी, केतन जुनघरे, उत्पल गोरे, सूरज गव्हाणे, विशाल शेंडे, प्रदीप बोबडे, सुजित कावळे, स्वप्नील शेरकी, सूरज भामरे, रितिक बुटले, नीलेश बोन्सुले, प्रणव बोबडे, मनोज बोढेकर, कवडु नागोसे, प्रवीण चौधरी, वैभव गालफडे, प्रतीक कावळे, करन झाडे, प्रज्‍जवल ढवस, यश मोरे, संकेत पारखी, अमोल ढोले, अतुल चोथले, अंकीत पारखी, अमोल काकडे यांची नियुक्ती करण्यात आली. अँड. पुरुषोत्तम सातपुते, कुंदा जेनेकर, दिनेश पारखी, संभाजी साळवे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केतन जुनघरे यांनी केले. संचालन गायत्री उरकुडे यांनी तर आभार प्रणव बोबडे यांनी मानले.