साकोली तहसीलदारांचे तडकाफडकी स्थानांतरण

0
16

साकोली दि. २९ : येथील तहसीलदार डॉ.हंसा मोहणे यांचे नागपूर येथे तडकाफडकी स्थानांतरण करण्यात आले असून त्यांच्या जागी नवे तहसीलदार म्हणून शोभाराम मोटघरे हे रुजू झाले. तत्कालीन तहसीलदार डॉ.मोहणे यांचे स्थानांतरण हे राजकीय वादातून झाल्याची चर्चाआहे.
साकोली तहसील कार्यालयाचा कारभार सुव्यवस्थीत सुरु असतांना व बदल्याचा कालावधी हा एप्रिल महिन्याचा असतांना अचानक साकोलीच्या तहसीलदारांची स्थानांतरण नागपूरला होणे ही साकोलीवासीयांसाठी आश्‍चर्याची बाब ठरली आहे. एक महिला अधिकारी म्हणून डॉ. हंसा मोहने यांनी उत्कृष्ठ कारकीर्द चालविली. गोपाळ समाजाला कधी नव्हे ते राशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र यासारख्या सोयी सुविधा देणार्‍या त्या साकोली तालुक्यातील पहिल्या तहसिलदार आहेत. तर वर्षाकाठी लाखो रुपयाचा महसूलही गोळा केला आहे. अशा कर्तबगार अधिकार्‍याची तडकाफडकी बदली होते एक आश्‍चर्यच म्हणावे लागेल.