प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या दोन दिवसीय बैठकीस प्रारंभ

0
11

राज्य शासनाच्यावतीने माहिती महासंचालकांनी केले स्वागत

नागपूर, दि. ७ : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) चौकशी समितीची दोन दिवसीय बैठक नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. रविभवन येथे आज समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. प्रारंभी राज्य शासनाच्यावतीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी कौन्सिलच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी.के.प्रसाद, सदस्य सर्वश्री प्रभात दास, उत्तम चंद्र शर्मा, प्रकाश दुबे, राजीव रंजन नाग, एस.एन.सिन्हा, प्रजानंद चौधरी, कौन्सिलच्या सचिव विभा भार्गव, उपसचिव पुनम सिब्बल, अवर सचिव सोनिया मलहोत्रा यांच्यासह कौन्सिलच्या अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार राज्य शासनाच्यावतीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी केला. यावेळी माहिती व जनसंपर्क संचालक मोहन राठोड तसेच विदर्भातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.सदर बैठक दिनांक ७ व ८ सप्टेंबर अशी दोन दिवस रविभवन येथे चालणार आहे. या बैठकीत कौन्सिलच्यावतीने आज १५ प्रकरणांवर तर उद्या १५ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.