नक्षलग्रस्त भागातील शेतकèयांची पदयात्रा; सरसकट दुष्काळाची मागणी

0
11

अर्धा तास थांबली महामार्गाची चाके

सुरेश भदाडे
देवरी,दि.७- तालुक्यातील ककोडी, चिचगड क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषीत करावा, या प्रमुख मागणीला घेऊन नक्षलग्रस्त भागातील हजारो शेतकèयांनी ककोडी, जबकसापासून देवरीच्या उपविभागीय कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. त्यामुळे नागपूर- रायपूर आणि रायपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली होती. कृषक मजूर संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी (दि. ७) ही पदयात्रा काढण्यात आली.
तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे कोरड्या दुष्काळरूपी तलवार शेतकèयांच्या खांद्यावर आहे. हातावर आणून पानावर खाणाèयांची अवस्था अतिशय बिकट आहे. दुष्काळापासून सावरण्यासाठी शासनाने शेतकèयांना भरीव मदत करावी, ही अपेक्षा परिसरातील शेतकèयांची आहे. दरम्यान, ककोडी, चिचगड क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषीत करावा, पीककर्ज माफ करावे, बियाणे नुकसानभरपाई द्यावी, गुरांना चारा उपलब्ध करून द्यावा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येकाला २०० दिवस कामे द्यावीत आदी मागण्यांना घेऊन परिसरातील चार हजार शेतकरी रस्त्यावर उतरले. कृषक मजूर संघटनेने शेतकèयांच्या या पदयात्रेचे नेतृत्व केले. तत्पूर्वी २१ ऑगस्टला या मागण्यांचे निवेदन देवरी येथील उपविभागीय अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांना देण्यात आले होते. ही पदयात्रा आज, सोमवारी ककोडी जबकसापासून सकाळी सुरू झाली. त्यामुळे नागपूर ते रायपूर, तसेच नागपूर ते रायपूर या महामार्गावरची वाहतूक जवळपास अर्धातास थांबली होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास ही यात्रा उपविभागीय कार्यालयावर धडकली. शेतकèयांचा मोठा जमाव होता. शेतकèयांचा जमाव पाहून पोलिसांनी उपविभागीय कार्यालयाचे द्वार बंद केले होते. विस्कळीत झालेली वाहतूक आणि शेतकèयांचा वाढता दबाव पाहून पोलिसांनी अखेर सुरक्षा द्वार उघडले. तेव्हा कुठे राष्ट्रीय महामार्गावची वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर देखील शेतकèयांचा राग शमला नाही. महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. संतप्त शेतकèयांची समजूत काढण्याकरिता उपविभागीय अधिकारी सुनिल सुर्यवंशी, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी एस. एन. मेश्राम, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र तिवारी यांनी प्रयत्न केला. परंतु, ठोस आस्वासन देऊन तत्काळ मागण्यांचे निरसन करा, अशी मागणी शेतकèयांनी भरपावसात लावून धरली. शहरात आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा शेतकèयांचा गैरराजकीय मोर्चा होता. या मोर्चामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान उपविभागीय अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी मोर्चास्थळी जावून कृषी सहायक, तलाठी यांच्या मदतीने सव्र्हेक्षण करण्यात येईल, शासनाने वीज बील, कर्जवसुलीस स्थगिती दिली. त्यामुळे वसुलीकरिता कुणीही तगादा लावणार नाही, असे आश्वासन दिले.