गोंदिया,दि.९ : जिल्ह्यात दिनांक १३ ते २७ सप्टेंबर दरम्यान विविध सण व उत्सव मोठ्या प्रमाणात असून दिनांक १३ रोजी तान्हा पोळा, दिनांक १७ रोजी गणपती स्थापना, दिनांक २४ रोजी बकदी ईद व दिनांक २७ रोजी अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस असून या सण-उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी दारु दुकाने, परवानाकक्ष मद्य, बियर व ताडी विक्रीकरीता बंद ठेवण्यात येत आहे. मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व सीएल-२, सीएल-३, एफएलबीआर-२, एफएल-१, एफएल-२, सीएल/एफएल/टिओडी-३, एफएल-३, पॉपी-२ व ट.ड.१ हया अनुज्ञप्त्या मद्य/बिअर व ताडी विक्रीकरीता दिनांक १३, १७, २४ व २७ सप्टेंबर रोजी सण उत्सवानिमीत्त बंद ठेवण्याचे आदेश दिले असून आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.