गोंदिया,दि.९ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने सन २०१५-१६ या वर्षात जिल्हास्तरीय तायक्वांदो व कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींकरीता तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी पोलीस बहुउद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय गोंदिया येथे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि.११ व १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा बदललेल्या वेळेनुसार दिनांक १४ व १५ सप्टेंबर रोजी आदर्श विद्यालय आमगाव येथे घेण्यात येणार आहे. संबंधित क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, स्पर्धक व विद्यार्थ्यांनी अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी कळविले आहे.