टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील तज्ञांची केटीएसला विनामूल्य रुग्णसेवा

0
11

गोंदिया,दि.९ : कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर रुग्णांना उपचार मिळावे या उद्देशाने जिल्ह्यातील कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालय येथे माहे सप्टेंबर २०१५ पासून कॅन्सर रुग्णांच्या तपासणीकरीता टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथील कॅन्सर तज्ञांद्वारे रुग्णांना विनामूल्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
कॅन्सर तपासणीकरीता टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथील ऑनको सर्जन डॉ.प्रणव इंगोले व डॉ.अभिषेक वैद्य आपली सेवा महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी देतील. तर डॉ.अमित जयस्वाल महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी रुग्णांना तपासतील. तपासणीचा वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत असून यादरम्यान रुग्णांकरीता शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांनी तपासणीच्या नोंदणीकरीता डॉ.मनिष बत्रा यांच्या ९४२३४०७३२३ व फरहान उल्ला खान यांच्या ८६५७९२७०८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते २ वाजेपर्यंत संपर्क साधावा. असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले आहे.