ग्रामसेवक डहाकेंनी केला चिचगाव ग्राम पंचायतीचा रेकार्ड गहाळ

0
10

गोरेगाव,दि.९ -गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील ग्रामसेवकाने ग्राम पंचायतीतील रेकार्डच गहाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात पंचायत समितीतर्फे रेकॉर्ड सादर करण्यासंबंधीचे आदेश देऊनही ग्रामसेवकाकडून आदेशाला थेट केराची टोपली दाखविली. याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून ग्रामसेवकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन सरपंच वैशाली तुरकर यांच्यासह गावकèयांनी गटविकास अधिकाèयानां दिले.
चिचगाव येथील ग्रामसेवक डहाके हे नेहमी गावकèयांशी असभ्य वागणूक करीत असत यावर गावकèयांनी त्यांची तक्रार पंचायत समितीकडे केल्यानंतर बदली करण्यात आली. ग्रामपंचायतच्या कामकाजात अडथडा होऊ नये यासाठी चिचगाव या ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक डहाके यांच्याकडून काढून ग्रामसेवक जे.एम. बोरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात सदर ग्रामसेवकास ग्रामपंचायत चिचगावचा रेकॉर्ड व कामाबाबत माहिती कळविण्यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयाकडून दोनदा कळविण्यात आले. तरीही सदर ग्रामसेवकाने आपल्या दबंगगिरीचा प्रत्यय दाखवीत रेकॉर्ड व कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे २४ ऑगस्ट २०१५ रोजी विस्तार अधिकारी पंचायत मार्फत रेकॉर्डचा पंचनामा करून ग्रामपंचायतमधील कपाटात उपलब्ध असलेला रेकॉर्ड कमिटी व पंचासमक्ष दाखविण्यात आला. सदर पंचनाम्यात सन २०१३-१४, २०१४-१५ व सन २०१५-१६ चा चालू स्थितीतील रेकॉर्ड, महिला सक्षमीकरण अंतर्गतचा रेकॉर्ड, ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा स्वच्छता समितीमार्फत नळ योजना कामाचा रेकॉर्ड आढळून आला नाही. त्यामुळे हा रेकॉर्ड ग्रामपंचायत चिचगाव येथे उपलब्ध करून देण्याबाबत पंचायत समितीमार्फत २७ ऑगस्ट २०१५ व ३१ ऑगस्ट २०१५ रोजी खास दूताद्वारे लेखी कळविण्यात आले. परंतु अजूनपर्यंत ग्रामपंचायत कमिटीला आवश्यक असलेला व ग्रामपंचायतीच्या नियमित प्रशासकीय कामास उपयोगी असलेला रेकॉर्ड सदर ग्रामसेवकाने सादर केलेला नाही. त्यामुळे सदर रेकॉर्ड हा ग्रामसेवक डहाके यांनी गहाळ केला आहे असा समज होत असल्याने ग्रामपंचायत कमिटी व गावातील जनतेत ग्रामसेवकांप्रति जनाक्रोश वाढत आहे.