31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात आज ३४ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात आज ३४ रुग्णांची कोरोनावर मात

0
106

blank

गोंदिया,दि.१५ः- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 1५ जानेवारी रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. गोंदिया
        आजपर्यंत 14004 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 13,593 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 230 आहे. 136 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 181 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 96.75 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 226.4 दिवस आहे.

blank