पांढरीच्या सरपंचपदी प्रतिभा मेश्राम

0
8

सडक अर्जुनी दि.१८ : पांढरी येथील सरपंचपदी प्रतिभा विजय मेश्राम यांची निवड करण्यात आली.सरपंचपदाकरीता राष्ट्रवादीच्या प्रतिभा मेश्राम व भाजपच्या अंजू राऊत यांनी नामांकन भरलेले होते. दरम्यान घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रतिभा मेश्राम यांना ७ तर अंजू राऊत यांना ४ मते मिळाली.
त्यामुळे प्रतिभा मेश्राम यांची सरपंचपदी वर्णी लागली. उपसरपंचपदी प्रमिला बुधराम पटले यांची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आर.एल.रहांगडाले, एस.के. कापसे यांनी काम पाहिले. मेश्राम यांनी निवडीचे श्रेय नवनियुक्त सदस्य दुर्गा कोसमे, सरिता शहारे, आशा पटले, गोपाल राऊत, विरेंद्र मेश्राम यांना दिले.