श्रीकांत जिचकार यांची जयंती साजरी

0
7

आमगाव दि.१८: येथील डॉ. श्रीकांत जिचकार मॉडेल स्कूल व राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूलच्या संयुक्तवतीने डॉ. जिचकार यांची जयंती सोमवारी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अँड. के.आर.शेंडे, संस्था सचिव विजय बहेकार, युवक कॉंग्रेस माजी अध्यक्ष अमर वराडे, कृष्णकुमार चौधरी, मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक के.व्ही.कोरे, आयटीआयच्या मुख्याध्यापक पुजा बडई, शामकुवर उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुण्यांसह विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. तर बुद्धीबळ स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणार्‍या निसद शामकुवर व प्रजोत मेश्राम यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन अमिषा तुरकर यांनी केले. आभार तृप्ती तांडेकर यांनी मानले.