आमदारांवर कारवाईसाठी धरणे

0
12

भंडारा दि.२२:: अवैध धंद्यातील लोकांना सहकार्य केल्याच्या कारणावरुन आमदारांवर व अन्य काही पक्षातील नेत्यांवर त्वरीत कारवाई करून गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमंच, महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंच व महिला दलित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धरणे आंदोलनाचे नेतृत्व विष्णुदास लोणारे, सुरज परदेशी यांनी केले. निवेदनानुसार, १३ सप्टेंबर रोजी शिवाजी वॉर्ड शुक्रवारी येथे जुगार अड्यावर धाड घालायला गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा तसेच पोलिसांवर आमदार चरण वाघमारे यांचे नाव घेऊन जुगार्‍यांनी हल्ला केला. जुगार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जुगार्‍यांना वाचविण्यासाठी आमदार चरण वाघमारे धाऊन आले. त्यांनी जुगार्‍यांना वाचविण्यासाठी पोलीस विभागावर दबाव आणला. या लोकप्रतिनिधीने पोलीस सहायक निरीक्षक सुधीर वर्मावर यांच्याविरुध्द विनयभंग केले म्हणून गुन्हा दाखल करायला लावला. त्यानंतर पत्रपरिषदेत भाजपाच्या या आमदारांसोबत सदैव विरोधात असणारे राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. त्यांनाही जुगार्‍यांचे सर्मथक करून पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्याची धमकी दिली. अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. धरणे आंदोलनात प्रमोद भांडारकर, अजय वासनिक, त्रिवेणी वासनिक, कोमल पाटील, विष्णूदास लोणारे, सूरज परदेशी,शालीक बागडे, राजू मेश्राम, मिनाक्षी बारसागडे आदींचा सहभाग होता.