सरकारपासून भ्रमनिरास झालेल्या जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या-खा.पटेल

0
11

गोरेगाव,दि.२२: सव्वा वर्षाचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. बेरोजगारांना रोजगार देणारे विदेशातून काळा पैसा आणणारे,धानाला भाव देणे आणि गरीबी हटविणार असे आश्वासन देणाèया भाजप सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही.त्यामुळे सरकारपासून भ्रमनिरास झालेल्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकत्यानेच नव्हे तर पदाधिकाèयाने कार्य करावे असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
ते गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित गोरेगाव नगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी,कार्यकर्ता बैठकित बोलत होते.
खा.पटेल म्हणाले की,प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण न झाल्याने,नवेगावबांध न्यु नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कटंगी,कलपाथरीचे प्रकल्पग्रस्तावर आत्महत्येची वेळ आली आहे.विरोधात असताना या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविल्याचे प्रसिध्दी पत्रक वाटणारे आता प्रकल्पग्रस्त आत्महत्या करीत असताना कुठे गेले असा प्रतिप्रश्न करीत भाजप सरकारने शेतकèयांचे बेहाल केल्याचा आरोप केला.तसेच आता ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी भाजपने आरएसएसच्या माध्यमातून पुर्ण देशात आरक्षण विरोधी वातावरण तयार करण्याचे काम सुरु केले आहे,याचा विरोध आपल्या पक्षाने ताकदिनीसी करावा असेही म्हणाले.मच्छीमारांचे प्रश्न, शेतक‍èयांच्या शेतीमालाला भावाचा प्रश्न, उसाचा प्रश्न तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यामध्ये भाजप सरकार अयशस्वी ठरले असून जनतेच्या हितासाठी वेळप्रसंगी आंदोलनाचा इशारा खासदार प्रफुल पटेल यांनी दिला.
यावेळी आमदार राजेंद्र जैन,माजी आमदार दिलीप बनसोड,जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,तालुकाअध्यक्ष केवलराम बघेले,महिला अध्यक्ष अनिता तुरकर,डुमेश चौरागडे,देवेंद्रनाथ चौबे,बाबा बोपचे,सोमेश रहागंडाले,महेंद्र चौधरी यांच्यासह जि.प.सदस्य,पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.