
-रुग्णांना समुपदेशन
गडचिरोली –. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर व एटापल्ली तालुक्यातील आलेंगा येथे मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवशीय गाव पातळी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण १९ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
जिल्ह्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यसनी रुग्णांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे. रुग्णांना उपचार घेणे सोयीस्कर ठरावे यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे बाराही तालुक्यात क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. तसेच गाव पातळीवरसुद्धा क्लिनिकचे आयोजन केले जाते. आजपर्यंत अनेक रुग्णांनी मोफत उपचार घेत दारूचे व्यसन सोडले आहे. कांचनपूर येथे नुकतेच क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यात ८ रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आले तर आलेंगा येथे ११ रुग्णांनी उपचार घेतला. दोन्ही क्लिनिकच्या माध्यमातून १९ रुग्णांनी पूर्ण उपचार दारूमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इतर व्यसनी रुग्णांनी उपचार घेऊन दारूमुक्त होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
कांचनपूर येथे अरुण भोसले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले तर छत्रपती घवघवे यांनी दारूचे दुष्परिणाम समजावून सांगत रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले तर यशस्वीतेसाठी गावातील पोलिस पाटील शंकरी प्रानेश्वर बाईन, सुक्रीता सुरेश मंडल, तंमुस अध्यक्ष सुभाष कुंजमोहन सरकार, दयाल अमरेंद्र मंडल, डॉ.वरद यांनी सहकार्य केले तसेच आलेंगा येथे साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. पूजा येलूरकर यांनी हेस हिष्ट्री घेतली. नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी सरपंच सनकु पुंगाटी, गाव पाटिल देवाजी नरोटे, विणुता नरोटे व पार्वती गोटा यांनी सहकार्य केले .