सुंदर व स्वच्छ अर्जुनीसाठी प्रयत्नशील : आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे

0
32

अर्जुनी-मोरगाव : ऐतिहासिक व पर्यटन स्थळासाठी हा तालुका   सुपरिचित आहे. तालुक्याची मुख्य बाजारपेठ अर्जुनी-मोरगाव आहे. तालुकास्तरावरील हे गाव नगरपंचायतमध्ये मोडत आहे. शहरात शुध्द पाणी, आरोग्य व्यवस्था, शिक्षण, रोड-रस्ते, नाल्या, विजेची व्यवस्था ह्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घ्यावा. शहरातील सतराही प्रभागातील विकासकामांचा कृती आराखडा तयार करुन तो शासनाकडे पाठवावा. त्याचा मी पाठपुरावा करुन निधीची व्यवस्था करण्याचे काम करणार. स्वच्छ व सुंदर अर्जुनी-मोरगावसाठी सदैव प्रयत्नशील राहणार, असे प्रतिपादन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले.

अर्जुनी-मोरगाव नगरपंचायतला शासनाकडून प्राप्त झालेल्या अग्निशमन वाहन व दोन कचरा गाडीच्या लोकार्पणप्रसंगी (20 ऑगस्ट) ते बोलत होते. दुर्गाचौक येथे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे हस्ते अग्निशमन वाहन व दोन कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने नगरपंचायतच्या मुख्याधिकारी शिल्पा राणी जाधव, माजी नगराध्यक्ष किशोर तरोणे, माजी नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, माजी उपाध्यक्ष विजय कापगते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी नगरसेवक एसकुमार शहारे, प्रकाश उईके, ममता पवार, वंदना जांभुळकर, यमुबाई ब्राम्हणकर, प्रज्ञा गणवीर, राकेश जायस्वाल, आर.के. जांभुळकर, नरेश रंगारी, नगरपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी नगरपंचायत सभागृहात आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे अध्यक्षतेत छोटेखानी सभा घेण्यात आली. आमदार चंद्रिकापुरे यांनी, शहरातील विकासासाठी कृती आराखडा तयार करावा. स्वच्छ व सुंदर अर्जुनी-मोरगावसाठी ठिकठिकाणी बागबगीचे, हायमास्ट लाईट, गटार नाल्या, सुंदर रस्ते, पिण्याचे शुध्द पाणी, आरोग्य या मूलभूत गरजासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. यासाठी आपन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यांनी सांगितले.