प्रा.डॉ.दिशा माणिक गेडाम यांचा नागपुरात गौरव

0
35

राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेतील यश

गोंदिया:- डॉ भा.ल. भोळे विचारमंच नागपुर द्वारा ” भारतीय लोकशाही पूढिल आव्हाने” या विषयावर राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेचे आयोजन एप्रिल महिन्यात करण्यात आले होते. या शोध निबंध स्पर्धेत प्रा. डॉ. दिशा माणिक गेडाम यानी शिर्ष तृतीय स्थान पटकावुन गोंदिया जिल्ह्याचं नाव झळकावण्यात यश मिळवलं आहे. शोध निबंध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम नुकताच विनोबा भावे सर्वोदय हॉल नागपुर येथे पार पडला. संस्था प्रमुख प्रा. शेषराव येरलेकर यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ.बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडलेल्या या बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रमात आमदार एड.अभिजित वंजारी यांच्या हस्ते प्रा.डॉ.दिशा गेडाम याना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रा. डॉ.दिशा गेडाम यांचे वडिल प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार माणिक गेडाम, आई पूर्व शिक्षिका मीराताई गेडाम प्रामुख्याने उपस्थीत होते. डॉ. दिशा गेडाम या शहरातील गोंदिया शिक्षण संस्थेचे गर्ल्स कॉलेज येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत व तळागाळातील महिला उत्थानासाठी कार्यरत “आम्ही विश्व लेखिका” या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. या यशाने चहुकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.