चंद्रपूर मनपाचा विशेष उपक्रम “स्वच्छता संकल्प देश का हर रविवार विशेषसा ” 

0
16
चंद्रपूर,दि.२४ ऑगस्ट – स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरात दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी “स्वच्छता संकल्प देश का,हर रविवार विशेषसा ” हा उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आला. या मोहिमेअंतर्गत “ गंदगी फैलाने और थुकने से आझादी ” या संकल्पनेवर साप्ताहिक मोहिम आयोजित करून यावर आधारित उपक्रम ७ दिवस राबविण्यात आले व रविवारी मेगा इव्हेंट घेण्यात आला.
   उपक्रमांतर्गत आम्रपाली भवन शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर या ठिकाणी “ littering and spitting se Aazadi” ( गंदगी फैलाने और थुकने से आझादी ) या विषयावर युवक,लहान मुले तसेच महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यामुळे विविध रोगांचा संसर्ग कश्याप्रकारे होऊ शकतो,त्याचे दुष्परीणाम काय, यावर प्रतिबंधात्मक उपाय काय यासंबंधी माहिती देण्यात आली. यादरम्यान उपस्थीत युवक व लहान मुलांनी  थुंकीचे दुष्परिणाम यावर विविध प्रश्न विचारले. एकूण १४७ लोकांनी यात सक्रीय सहभाग नोंदविला. त्याचप्रकारे या थीमवरआधारित लहान मुलांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धासुद्धा घेण्यात आली. या ऑनलाइन स्पर्धेत 67 मुलांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट तीन चित्रांची निवड करून सदर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये,अस्वच्छता पसरवू नये याबाबत जनजागृती करण्यात आली.
    “स्वच्छता संकल्प देश का,हर रविवार विशेषसा ”या मोहिमेंतर्गत ऑगस्ट महीन्यातील प्रत्येक रविवारी त्या आठवड्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देण्यात आलेल्या साप्ताहिक संकल्पनेवर ( थीम ) विविध प्रभागात कार्यक्रम महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार,आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे. स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहेत.