एड्स मुक्त गोंदियाचा संकल्प घ्या- प्राचार्य बाहेकर

0
36

गोंदिया,दि.26ः महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व जिइएस सोसायटी द्वारा संचालित गर्ल्स कॉलेज तर्फे जागतिक युवा दिन निमीत्य एच आई वी व एड्स प्रतिबंधक जनजागृती पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे उदघाटन केटीएस सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांचे हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी गर्ल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.के.बाहेकर होते.
मार्गदर्शक म्हणून गोंदिया जिल्हा एड्स नियंत्रण पथकचे जिल्हा समनव्यक संजय जेणेकर होते. रेड रिबन क्लबच्या समुद्देशिका अपर्णा जाधव,समुपदेशक इंदूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विदर्भ विभाग एनएसएसच्या विद्यापीठ प्रमुख डॉ. कविता राजाभोज परीक्षक म्हणून प्रामुख्याने उपस्तीथ होत्या.
12 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट स्वामी विवेकांनंद यांची जयंती म्हणून दरवर्षी जागतिक युवा पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यानिमित्य महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी तर्फे युवा मध्ये एड्स बाबत व्यापक जनजागृती होण्याकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात.त्या अनुषंगाने रेड रिबन क्लब तर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना केटीएसच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे आपली एड्स तपासणी करून घ्यावी प्रतिबंध हाच एक उपाय आहे. दूषीत इंजेक्शन व दूषीत रक्त,असुरक्षित शरीर संबंधातून एड्स पसरतो.भारतात एड्सला बळी पडणाऱ्यामध्ये युवा वर्गाचे प्रमाण जास्त आहे,तेव्हा काळजी घ्या. संयम पाळा एड्स टाळा हा संदेश दिला.
गर्ल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.के.बाहेकर यांनी उपस्तीथ विद्यर्थिनीना आवाहन केले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यर्थिनीनी समाजात आरोग्याबाबत व्यापक जनजागृती केली पाहिजे. स्वंयसेवक म्हणून चांगली भूमिका निभावली पाहिजे,जागतिक युवा दिनाच्या पर्वावर आपण सर्व एड्समुक्त गोंदियाचा संकल्प करू या असे आवाहन केले.
याप्रसंगी संजय जेणेकर व अपर्णा जाधव यांनी सुद्धा आरोग्य विषयक माहिती देऊन प्रबोधन केले.पोस्टर स्पर्धेच्या विजेत्या प्रथम 3 विद्यर्थिनींना प्रमाणपत्र ट्रॉफी व रोख बक्षीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांचे हस्ते देऊन सहभाग नोंदविणार्या मुलींना सुद्धा प्रमाणपत्र प्रमुख अतिथीच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.