गुन्हेगारीवर आळा घालण्याकरीता पोलीस-नागरिक संवाद आवश्यक- ठाणेदार सिगंनजुडे

0
80

चिचगड,दि.26:-‘देशाच्या सीमेवर संरक्षण दलातील जवान, तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य अहोरात्र सुरू असते. ते चोवीस तास आपले कर्तव्य बजावतात. म्‍हणूनच सामान्य नागरिक सुरक्षित आहेत. कर्तव्य बजावताना जवान असो अ‌थवा पोलीसाना नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे.तसेच ‘पोलीस-नागरिक संवाद गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक आहे,’ असे मत देवरी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरिक्षक रेवचंद सिगंनजुडे यांनी व्यक्‍त केले.

पोलीस स्टेशन कार्यालय देवरीच्या वतीने शहरात दररोज सायंकाळी रुट मार्च करुन शहरातील नागरीकांशी संवाद करुन लोकांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती दुर करणे, शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणने, कोरोनाचा काळ पाहता व्यावसायिकांच्या दुकानात होत असलेली गर्दी कमी करणे, नागरीकात पोलीसांची भिती न राहता प्रत्यक्षपणे येत असलेल्या अडचणी नागरीकानीं पोलिसाना सागांवे याकरीता देवरी शहरात ठाणेदार व पोलीस शिपाई शहरातील प्रत्येक गल्लीतील छोट्या मोठ्या दुकानदारासह नागरीकांना रुट मार्च काढून पोलीस- नागरीकांचा संवाद उपक्रम सुरु केले आहे. ठाणेदार सिगंजुडे यानीं नागरीकांसाठी आपला मोबाईल नबंर देत 9764134111 चोवीसतास सेवा पुरविण्यात येणार असल्याचे आवाहन केले आहे. यामध्ये नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करण्याची गरज असल्याचे ठाणेदार सिगंनजुडे यानीं म्हटले.