देवरी नगरवासीयांच्या सेवेत अग्निशमन वाहन रूजू

0
33

देवरी,दि. 26- देवरी शहराला बहुप्रतिक्षित असलेले अग्निशमन वाहन हे अखेर (आज दि.26) स्थानिक नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या सेवेत रूजू झाले.

या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, देवरी तालुकाय कॉंग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया, माजी सरपंच जित्ते भाटीया, माजी उपनगराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, युवा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शकील कुरैशी,  कुलदीप गुप्ता,श्री.आत्राम, श्री.बन्सोड, बळीराम कोटवार, कलिराम किरसान,  रोशन भाटिया,  अमित तरजुलै,प्रशांत कोटांगले, दिलीप दुरुगकर,कमलेश पालीवाल, राजेश शाहू,.शार्दुल संगीडवार, छगनलाल  मुगणकर,देवरी नगरातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी आणि नगरपंचायत चे कर्मचारीमोठ्या संख्येने उपस्थित होते.