परमवीरसिंगांना दणका! चांदीवाल आयोगाने ठोठावला दंड

0
44

मुंबई,दि.26- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्याऱ्या चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहणाऱ्या परमवीर सिंह यांना बुधवारी आयोगाने चांगलाच दणका दिला. 

आयोगाने सिंग यांना प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे निर्देश दिले असताना सुद्धा सिंग यांनी प्रतिज्ञापत्रे आयोगापुढे सादर करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांना 25 हजाराचा दंड ठोठावले. आयोगाने दंडाची ही रक्कम  मुख्यमंत्री कोरोना साहायता निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी सुद्धा सिंग यांना जून महिन्यात 5 हजाराचा तर 19 ऑगस्ट रोजी 25 हजाराचा दंड ठोठावला होता.