शिक्षक पतसंस्थेच्या अहवाल पुस्तिकेत चुकीची माहिती,जागृत सदस्यांनी नोंदवला निषेध

0
107

गोंदिया,दि.27ः- जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया र.नं ०१ च्या संस्थाअध्यक्ष व सत्ताधारी संचालकांच्या अनागोंदी कारभारामुळे पतसंस्था डबघाईस आली असून संस्थेत फोफावलेला भ्रष्टाचार व सभासदांच्या बचत ठेवीचा गैरवापर करून ८३ लक्ष रुपये परस्पर विड्राल केल्याचे व आमसभेच्या अहवाल पुस्तिकेत चुकीची माहिती दिल्याबदद्ल शिक्षकांनी विरोध करीत संस्था कार्यालयासमोर आमसभा पुस्तिका जाळून निषेध नोंदवला.संस्थेचे संचालक एस.यु.वंजारी व पुराेगामी शिक्षक संघटनेचे नेते हरिराम येरणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी विड्रालकरीता व्यवस्थापकाने विरोध केला पण त्यालाही सत्ताधारी संचालक मंडळाने तिलांजली दिल्याचा आरोप केला आहे.संस्थेत वारेमाप खर्च चव्हाट्यावर आणणारे सभासद , यांच्यावर भविष्यात कलम ३५ आणून मुस्कटदाबी करण्यास, भविष्यात कोणताही संचालक मंडळ पुढे हिंमत करणार नाही. यासाठी जिल्हाभर आठही तालुक्यांत व मुख्यालय असलेल्या गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत जागृत सभासदांनी तोंडावर काळी फीत लावून 25 आँगस्ट ला काळा दिवस पाळत निषेध व्यक्त केला.यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांनी सहभाग नोंदविला.