अर्जुनी मोरगाव,दि.27ः- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील परसटोला येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे भूमीपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते आज शुक्रवार करण्यात आले.यावेळी सरपंच रामोजी कुंभरे, अर्जुनी/मोर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष योगेश नाकाडे, एफ आर टी शहा, कुंडलिक कोवे, युवराज गहाणे, भजन शहारे, धनराज नेवारे,ज्ञानेश्वर गेडाम, गोपाल लोथे,गिरीधर रक्षा ,प्रीतम रामटेके, विकास रामटेके, प्रणय शेंडे भूषण शेंडे व मान्यवर गावकरी उपस्थित होते.