30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पवनी /धाबे येथं विकास कामांचे भूमिपूजन

पवनी /धाबे येथं विकास कामांचे भूमिपूजन

0
55

blank

अर्जुनी /मोर :-अंतर्गत गोठणगाव जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पवनी /धाबे इथं विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. अर्जुनी /मोर विधानसभा मतदार संघांचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
विकास कामांमुळे गावची प्रगती होते असे प्रतिपादन करून आमदार चंद्रिकापुरे यांनी आमदार निधीतून कान्होली, पवनी /धाबे, तीडका, येलोडी, आणि झाशीनगर येथील गावांतर्गत रस्ते निर्माण करण्याचा प्रण केला.

दरम्यान पवनी/धाबे च्या सरपंच श्रीमती पपीताताई नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते यांच्या शिस्टमंडळाने भेटून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात गावातील विकास कामे करण्याबरोबरच राज्यात इयत्ता 1ली पासून शाळा सुरु करणे, गोंदिया चंद्रपूर पससेंजर लोकल ट्रेन सुरु करणे आदि मागण्यांची विनंती केली. तर ग्रामपंचायत येरंडी/दर्रेच्या उपसरपंच श्रीमती सोनिया वाढई आणि प्रकाश शहारे यांनी निवेदन सादर करून मोबाईल टॉवर आणि वाचनालयाची मागणी केली.यावेळी गावकरी नागरिक उपस्थित होते.

blank