स्वतःच घर हे सुख,शांती आणि समाधान देतं -आमदार चंद्रिकापुरे

0
28

(घरकुल योजनेत सरपंचांचा सत्कार )
अर्जुनी /मोर :-अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येक व्यक्तींच्या मूलभूत गरजा असून आपलं स्वतःच घर असलं कि मनाला शांती सुख आणि समाधान लाभतं , तरी शासकीय घरकुल योजनेचा गरजू व्यक्तीनी लाभ घ्यावे असे आवाहन अर्जुनी/मोर विधानसभा मतदार संघांचे आमदार  मनोहरराव चंद्रिकाकापुरे यांनी (ता. 28) केलं.
दरम्यान महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतिच्या सरपंचांचा त्यांनी सत्कार केला. प्रशस्तीपत्र प्रदान करून सरपंचांचे कौतुक करण्यात आले.
येथील उमेदच्या सभागृहात आयोजित या सत्कार समारंभ कार्यक्रमात ग्रामपंचायत ताडगाव, कोरंभी, केशोरी, गुढरी, कुंभीटोला आणि पवनी /धाबे येथील सरपंचांना हे प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आलं.
पवनी /धाबे येथील सरपंच श्रीमती पपीताताई नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते आणि सदस्य कैलाश पंधरे यांनी स्वीकारला. या प्रसंगी उपस्थित सरपंचानी सांगितलं कि आम्ही केलेल्या उत्कृष्ट कार्याची ही पावती असून यापुढे अजूनही शासकीय पुरस्कार आपल्याच झोळीत आणण्याचा प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी विलास निमजे यांनी, संचालन विस्तार अधिकारी ब्राम्हणकर यांनी तर आभार स्वच्छता विभागाचे अंबुले यांनी केलं. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वच अभियंत्यांनी सहकार्य केलं.