सेलोटपारच्या उपसरपंचाची कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये घरवापसी

0
47

तिरोडा : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले  यांच्या कार्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत सेलोटपारचे  उपसरपंच शिवकुमार शेंडे यांनी भाजपमध्ये घरवापसी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.या वेळी आमदार रहांगडाले यांनी त्यांचे स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यामध्ये प्रामुख्याने माजी उपसरपंच संजय शेंडे, देवेद्र शेंडे, ओमकार अंजनकर, ताराचंद शेंडे, छगन नागरिकर, सतीश गोंधूळे, तुषार उके कोडेलोहारा यांचा समावेश आहे.

भाजपमध्ये घरवापसी कार्यक्रमात भाजप जिल्हा संघटनमंत्री संजय कुलकर्णी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाला वहिले, माजी जि.प. सदस्या रजनी कुंभरे, कृउबास संचालक मिलिंद कुंभरे, सेवा सह. अध्यक्ष उत्तम कुकडे, सरपंच अनिता कुकडे, मनीषा कनपटे, संगीता वलके, सदस्य अनिता बांते, सुधीर चौधरी, धनराज भोयर, सरपंच सत्यवान कुकडे उपस्थित होते.