विधवेला मिळाला न्याय: अनुंकपा तत्वावर नोकरी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

0
88
गोंदिया,दि.02 :अनुकंपा तत्वावर नोकरी मिऴण्यासाठी सालेकसा तालूक्यातील भजेपार येथील श्रीमती मीना सूखदेव राणे ह्या विधवा महिलेने सन 2017 मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केलेल्या याचिकेमुळे न्याय मिळाला असून अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सविस्तर वृत असे कि ,मीना राणे यांचे पती सूखदेव राणे हे सालेकसा येथील आश्रम शाळेत स्वयंपाकी पदावर कार्यरत असताना त्यांचा मृत्यु झाला.म्हणून अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी संस्थेला अर्ज केला होता.परंतू, संस्थेने तो अर्ज नाकारल्यामूळे महिलेने 2017ला नागपुर खंडपीट उच्च नायालयात रीट याचिका दाखल केली.या याचिकेतील विविध बाबींचा अभ्यास करुन दिनाक 14/11/2019 न्यायमुर्ती आर.के.देशपांडे व न्यायमुर्ती एम.एन.जाधव याच्या खंडपीठाने मागासवर्गीय शिक्षण संस्था रेंगेपार (कोहळी)व प्रकल्प अधिकारी देवरी याना सदर महिलेला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावे असे दिशा निर्देश दिले .याचिकाकर्तीतर्फे अँड अदिती योगेश पारधी /कटरे व अँड पी.व्ही.ठाकरे यानी बाजु माडंली या महिलेला न्याय मिऴवुन देण्याकरीता आदीवासी आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्ष भोजराज फुंडे यानी महत्वपुर्ण सहकार्य केले.