महाराष्ट्र शासनाचे ई-पीक पहाणी मोहीम अयशस्वी – ग्राम पंचायत सदस्य कपिल राणे

0
28

गोंदिया–नुकतेच महाराष्ट्र शासनाने ई- पीक पाहणी अँप करून प्रत्येक शेतक्यांनी आपल्या शेत पिकाची नोंदणी सदर अँपद्वारे करावे असे आव्हान शासनानी केले आहे. परंतु, ई-पिक नोंदणी करण्यात ग्रामीण क्षेत्रांमध्ये शेतकन्यांना अनेकअडचर्णीना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे  नाहक त्रासापोटी शेतकरी कंटाळले आहेत. याकरीता तलाठीकडूनच पीक पाहणी करावी, अशी मागणी कपिल राणे नी केली आहे. शेतक-यांच्या खात्यामध्ये अद्याप पर्यन्त जमा झालेला नाही त्यामुळे शेतक-यांमध्ये रोष ची भावना निर्माण झालेली आहे. रबी धानाचे चुकारे सुद्धा शेतक-यांच्या खात्यामध्ये अद्याप अनेक शेतकन्यांना मिळणे बाकी आहे. शेतक-यांनी साहूकारांशी कर्ज घेतला आहे.त्यांच्याकड़े पैसे नसल्याने ते मोबाईल खरेदी कसे करणार. कमीत कमी ७५ टक्के शेतक-यांकड़े मोबाईल नाही मग ई-पीक पाहणी कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. ई-पीक पाहणी अँपद्वारे पिकाची नोंदणी करताना सुद्धा जनक अडचणी निर्माण होत आहेत पिकाची माहिती भरताना पिकांची माहिती कशी भरावी हे अनेक शेतकन्यांना त्याचप्रमाणे कायम पड क्षेत्राची नोंदणी, बांधावरची झाडांची नोंदणी करताना सुद्धा अनेक अडचणी निर्माण होत आहे.ई-पीक पाहणी सामान्य शेतक-यांना भरणे शक्यनाही त्यांच्याकडे अंड्रॉइड मोबाइल असला तरीपण अनेक ठिकाणी: एप मध्ये त्यांना अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे. ई-पीक पाहणी प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी सर्वेचे वेळी निर्माण होत आहे. त्यासाठी सदर ई-पीक पाहणी शासकीय यंत्रने च्या माध्यमातून तलाठी मार्फत करण्यात यांवे. जेणेकरून सदर मोहिम चांगल्या प्रकारे फार पाळता येईल. अशी मागणी चुटिया येथील ग्राम पंचायत सदस्य कपिल राणे यांनी प्रशासनाला केली आहे.