माजी सैनिकाची जमीन हडपणार्‍यांची चौकशी करा

0
36

– क्रांती राऊत यांची पत्रपरिषदेत केली मागणी

यवतमाळ-यवतमाळ येथील माजी सैनिक कै. मारोतराव टकले यांना मिळालेली जमीन कंत्राटदार सुमित बाजोरिया व बंटी जयस्वाल यांनी हडपली असून, यवतमाळतील अनेक जमिनींकरिता त्यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून गरीब जनतेला फसवले आहे. त्यामुळे या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क‘ांती धोटे राऊत यांनी केली.
शुक‘वार, 3 सप्टेंबरला नेताजी भवनात घेतलेल्या पत्रपरिषदेत महिला राष्ट्रवादी काँग‘ेसच्या प्रदेश सरचिटणीस राऊत बोलत होत्या. याप्रसंगी प्रकाश टकले, दीपक पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना क‘ांती राऊत म्हणाल्या, माजी सैनिक मारोतराव टकले यांना शासनाकडून वडगाव रोड येथे जमीन मिळाली होती. सुमित बाजोरिया यांनी फसवणूक करून ही जमीन परस्पर विक‘ी केली. त्याचबरोबर यवतमाळातील जमीन घोटाळ्यात बंटी जयस्वाल यांचा मोठा हात आहे.
या दोघांना उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय आणि पोलिसांनीही मदत केली आहे. त्यामुळे सुमित बाजोरिया व बंटी जयस्वाल यांच्याशी दोन वर्षांपासून फोन संभाषण झालेल्या व्यक्तींचीही चौकशी करण्यात यावी. आम्ही या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्याकडे तक‘ार केली आहे. या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर तीव‘ आंदोलन उभारू, असा इशारा यावेळी देण्यात आला.