गडचिरोली 2,Gondia 0,बुलडाणा 2,वाशिम 0,भंडारा 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0
33

गडचिरोली जिल्ह्यात 671 तपासण्यांपैकी 2 कोरोना बाधित तर 1 कोरोनामुक्त

गडचिरोली,दि.05 : आज गडचिरोली जिल्हयात 671 कोरोना तपासण्यांपैकी 2 नवीन कोरोना बाधित
आढळून आले. तसेच आज 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे
जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30736 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29953 आहे. तसेच सद्या 37 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.45 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.12 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.नवीन 02 बाधितांमध्ये भामरागड तालुक्यातील 02 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 01 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे.

GondiaCoronaUpdate
आज 0 रूग्णाला डिस्चार्ज,
क्रियाशील रुग्ण 8
• कोरोना पॉझिटिव्ह- 0
• बरे झालेले रुग्ण 40496
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 41208
• आज 00 मृत्यू
• एकूण मृत्यू 576
• रिकव्हरी रेट 99.27टक्के

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 2,एकूण पॉझिटिव्ह : 87475,मृत्यू : 673,आतापर्यंत डिस्चार्ज :86712,आजचे डिस्चार्ज : 2

वाशिम जिल्ह्यात नवीन एकही कोरोना बाधित नाही; एका व्यक्तीला डिस्चार्ज-एकूण पॉझिटिव्ह – ४१७२३,ऍक्टिव्ह – १६,डिस्चार्ज – ४१०६८,मृत्यू – ६३८

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

भंडारा,दि.5 :- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या तीन आहे. आज 337 व्यक्तींची चाचणी केली असता 00 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 01 सक्रिय रुग्ण आहेत.आज 03 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58950 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60084 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 51 हजार 562 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60084 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58950 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60084 झाली असून 01 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.