पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू करण्यासाठी 15 ला रास्ता रोको आंदोलन-भाकपचे आवाहन

0
22
भंडारा -: कोरोना संसर्गाच्या महामारी ने मागील सुमारे दीड वर्षापासून अनेक लोकल आणि पॅसेंजर गाड्या रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत. मात्र काही विशेष गाड्या सुरू ठेवले आहेत. त्यातील काहींचे थांबेच दिले गेले नाहीत. तर अनेक  लाभार्थी सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहेत.माञ तोट्यात चालणा-या एस.टी.बसेस मध्ये सर्व सवलती लागू आहेत.
   भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या पॅसेंजर व लोकल रेल्वे गाड्या त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2021 ला दुपारी 12 वाजता नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदळ रेल्वे चौकीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. सदर रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन  भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जन संघटनांच्या वतीने करण्यात आले असून आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर, राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड हौसलाल रहांगडाले, गडचिरोली जिल्हा सचिव डॉक्टर महेश कोपुलवार, चंद्रपूर जिल्हा सचिव प्रा. नामदेव कन्नाके ,गोंदिया जिल्हा सचिव कॉम्रेड मिलिंद गणवीर व भंडारा जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके हे करीत आहेत.
          या  आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन काॅ.शिवकुमार गणवीर, काॅ.हिवराज उके,काॅ.माधवराव बांते,काॅ.सदानंद इमले,काॅ,गजानन पाचे,काॅ.जयप्रकाश मसरके,काॅ.राजू बडोले,काॅ.शांताबाई बावनकर,काॅ,माणिकराव कुकडकर,काॅ. देवीदास कान्हेकर,काॅ.भुपेश मेश्राम,काॅ.वामनराव चांदेवार, काॅ.वाल्मिक नागपूरे,काॅ.रत्नाकर मारवाडे,काॅ.मंगेश माटे,काॅ.शिशुपाल अटाळकर,काॅ.ममता तुरकर,सुखराम धनिस्कार,काॅ.राजू लांजेवार,काॅ.विशाल इलमे इ.ने केले आहे.