चिचगड अप्पर तहसिल कार्यालयामुळे विद्यार्थ्यांसह शेतकर्यांना त्रास

0
85

सुभाष सोनवणे/चिचगड,दि.9ः- देवरी तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या चिचगड परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चिचगड येथे अप्पर तहसिलदार कार्यालय सुरु करण्यात आले.परंतु हे कार्यालय आता फक्त नाममात्र राहिले असून अप्पर तहसिलदाराच्या डिजिटल स्वाक्षरी अभावी विद्यार्थ्यांना व शेतकर्यांना अडचणीला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे.

चिचगड येथे अप्पर तहसील कार्यालय सुमारे चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते.तेव्हापासून आतापर्यंत काही काम सुरळीत होत होते परंतु गेल्या दीड-दोन महिन्यापासून अप्पर तहसिलदारच नसल्याने व स्टाँप नसल्याने इंकम सर्टिफिकेट ,कास्ट सर्टिफिकेट ,नॉन क्रिमिलियर ,डोमेशिअल आदी तसेच निराधाराचे सर्वच कामे रखडल्याने जनता त्रस्त झाली आहे.विशेष म्हणजे चिचगड अप्पर तहसील कार्यालयात जे अप्पर तहसीलदार आहेत.त्यांची डिजिटल स्वाक्षरी नसल्यामुळे काम थांबल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.