अति.मुकाअ पदावर रायगड येथील श्रीमती कबमुनरे यांची नियुक्ती

0
206

गोंदिया,दि.09ः-महाराष्ट्र विकास सेवा गट अ व ब मधील अधिकार्यांच्या बदल्या शासनाने केल्या असून गोंदिया जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी या रिक्त पदावर रायगड जिल्हा परिषदेच्या पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती.एस.एल.कबमुनरे/पुुंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिक महानगरपालिका उपायुक्त पी.एम.चौधरी यांची भंडारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले.आमगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांची पंचायत समिती कर्जत जि.रायगड येथे गटविकास अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.