गोंदिया 0,भंडारा 0,गडचिरोली 0,बुलडाणा 8,वाशिम एका कोरोना बाधिताची नोंद

0
19

गोंदिया,दि.12 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज  12 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज
डिस्चार्ज रुग्णांची संख्या 1 आहे.आजपर्यंत 41,211 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,498
रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 7 आहे. 6 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 448998 नमूने पाठविण्यात आले. यामध्ये RT-PCR चे 229282 नमूने असून रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) चे 219716 नमूने आहेत. कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. ज्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी  8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

भंडारा,दि.12- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुध्दा शून्य आहे. आज 517 व्यक्तींची चाचणी केली असता 00 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 01 सक्रिय रुग्ण आहे.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58951 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60085 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 53 हजार 324 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60085 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58951 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60085 झाली असून 01 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्ह्याबाहेरील एका कोरोना बाधिताची नोंद; एका व्यक्तीला डिस्चार्ज
एकूण पॉझिटिव्ह – ४१७३२,ऍक्टिव्ह – १४,डिस्चार्ज – ४१०७९,मृत्यू – ६३८
गडचिरोली जिल्ह्यात 396 तपासण्यांपैकी आज एकही बाधित नाही तर 2 कोरोनामुक्त
गडचिरोली, दि.12 : आज गडचिरोली जिल्हयात 396 कोरोना तपासण्यांपैकी आज जिल्हृयात एकही  बाधित नाही. तसेच आज 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30743 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29982 आहे. तसेच सद्या 15 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.52 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.05 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. तर आज कोरोनामुक्त झालेल्या  02 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 1, जणांचा समावेश आहे.

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 8,एकूण पॉझिटिव्ह : 87524,मृत्यू : 673,आतापर्यंत डिस्चार्ज :86803,

आजचे डिस्चार्ज : 7