गोल्डन गणेश उत्सव मंडळ देवरी तर्फे रक्तदान शिबीर

0
20

चिचगड,दि.13:- रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.ही गरज लक्षात घेऊन देवरी शहरातील प्रभाग क्रमाकं -१२ येथील गोल्डन गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रेवचंद सिगंनजुडे व नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी आचले उपस्थित होते.

लोकमान्य ब्लड बँक गोदिंयातर्फे रक्तदात्यांची हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि इतर तपासण्या करुन ३५ हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. विशेषता या गोल्डन गणेश उत्सव मंडळाला रक्तदान शिबीराला शहरातील महिलांचा चांगला प्रतीशाद मिळाला. रक्तदान शिबीर गोल्डन गणेश उत्सव मंडळाचा मंडपातच घेण्यात आले. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानीं रक्तदान करणार्या व्यक्तीचें पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.गोल्डन गणेश उत्सव मंडळातर्फे १४ व १५ सप्टेंबरला दोन दिवसीय मतदान नोदनीं शिबीर आयोजित करण्यात आले आहे.