समृद्धी पाणी वापर संस्था इटखेडाच्या अध्यक्षपदी राकेश शेंडे यांची निवड

0
22

अर्जुनी-मोर-तालुक्यातील इटखेडा येथील समृद्धी पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदावर राकेश सिताराम शेंडे यांची एक मताने निवड करण्यात आली. तर संचालक म्हणून यादव चांदेवार,मालनबाई उईके,केशव गिर्हेपुंजे,प्रल्हाद चांदेवार, शालिग्राम सुखदेवे, माजी प्राचार्य लहू बोळणे,पुष्पाबाई लांजेवार,शांताबाई करंजकर, श्यामसुंदर खुने, यादव भावे, तर सचिव म्हणून विजय मेश्राम यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष राकेश शेंडे यांनी सांगितले की पाणी वापर संस्थेच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन समृद्धी पाणीवापर संस्थेची भरभराट करता येईल तसेच इटियाडोह धरणातील पाणी शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावा तसेच शेतकऱ्यांनी पाणीवापर संस्थेचा कर वेळेवर भरावा असे आवाहन केले.