36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ वसतीगृहासाठी ओबीसी युवा महासंघाचे आंदोलन

वसतीगृहासाठी ओबीसी युवा महासंघाचे आंदोलन

0
31

blank

नागपूर,दि.13ः राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ नागपूर शहरच्यावतीने बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घरा समोर ओबीसींच्या न्याय मागण्या करीता आंदोलन करून निवेदन देण्यात आले.निवेदनात ओबीसी समजातील विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे.स्वाधार योजना सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावी. परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती 10 विद्यार्थ्यांची संख्या वाढवून 100 करण्यात यावे आदी मागण्याचा समावेश होता.आंदोलनात पराग र. वानखेडे युवा अध्यक्ष (नागपूर शहर),कार्याध्यक्ष शुभम वाघमारे,उपाध्यक्ष सुशांत शिरपूरकर,गजानन दांडेकर,अभिजित ठाकरे,गणेश हांडे, ग्रामीण कार्याध्यक्ष समीर वानखडे, विक्रम मानकर , पूर्व अध्यक्ष दिनेश माहुलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

blank