अखेर लाखनी शहरात अग्निशामक वाहन दाखल

0
23

लाखनी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या विशेष प्रयत्नाने लाखनी नगरपंचायतच्या मागणीनुसार अग्निशामक वाहन आज अखेर लाखनी नगरपंचायतला प्राप्त झाले. राष्ट्रीय महामार्गावर वसलेले लाखनी हे एक महत्त्वाचे शहर आहे, मोठ्या प्रमाणात व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योग या ठिकाणी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठाने किंवा अनेक घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरासाठी स्वतःची स्वतंत्र अग्निशामक सेवा असणे आवश्यक होते आणि त्या दृष्टीने मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नाने अग्निशामक वाहन अखेर लाखनी येथे दाखल झाले. यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर तिथे होणारे नुकसान हे टाळता येईल, यापूर्वी लाखनी येथे आग लागल्यास भंडारा ईथून अग्निशामक वाहन येत असे यामध्ये बराच वेळ जात होता आणि नुकसानाचे स्वरूप मोठे व गंभीर होते. आता दाखल झालेल्या अग्निशामक वाहनांमुळे हे धोके टाळता येणार आहेत आणि म्हणून या अग्निशामक वाहनासाठी लाखनी नगरवासीयांनी मा. नानाभाऊ पटोले यांचे आभार व्यक्त केले आहेत.