सिलेगाव येथील 11 वर्षीय कॅन्सर पीडित मुलाला मदत करण्याचे आवाहन

0
111

तुमसर,दि.15: कर्करोगाने ग्रसित आणि परिस्थितीने गरीब असलेल्या सिलेगाव येथील आदित्य योगेश्वर खऊळ या मुलाला मदतीची अत्यंत गरज असून दानशूर व्यक्तींनी शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य हिरालाल जी नागपुरे यांनी केले आहे.
आदित्यचे वय 11 वर्षे असून भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथील रहिवाशी आहे.
सदर रोगावर शासकीय उपचार उपलब्ध आहेत तरी पण येण्या-जाण्याचा आणि किरकोळ खर्च करण्यासाठी सदर रुग्णाकडे पैसे नाहीत.
ही बाब लक्षात येताच हिरालाल जी नागपूरे यांच्या धर्मपत्नी सौ लताबाई हिरालाल नागपुरे यांनी स्वतःचे मंगळसुत्र गहाण ठेवून आदित्यला रुपये 10,000 हजार ची मदत केली आहे.दिनांक 14 सप्टेंबर रोजी मंगळवार ला शिल्लेगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी ही मदत सुपूर्द केली आहे.
कॅन्सर पीडित असलेल्या आदित्यला मदतीची गरज असून ज्यांना जेवढे शक्य होते तेवढी मदत समाजातील दानशूर व्यक्तीने करावी असे आवाहन या भागाचे माजी पंचायत समिती सदस्य हिरालालजी जी नागपुरे यांनी केले आहे.