ओबीसी विषयाला घेऊन भाजपाचे भंडारा जिल्हाभर आंदोलन

0
22

भंडारा-ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करून आरक्षण कायम ठेवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आघाडी सरकारच्या चुकीमुळे दुर्लक्षित पणामुळे ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण गमवावी लागले. सरकार योग्य पद्धतीने मांडू न शकल्याने ही वेळ ओबीसी वर आली. ओबीसींचे रद्द झालेल्या आरक्षण कायम करावे म्हणून भाजपच्या वतीने याआधी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान काही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. ओबीसींच्या आरक्षणाचा विषय निकाली निघाला नसल्याने या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. हे लक्षात घेत भाजपच्यावतीने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. नेमण्यात आलेल्या ओबीसी आयोगाने तात्काळ एम्पिरिकल डाटा गोळा करावा आणि आरक्षण कायम राहण्याच्या दृष्टीने भक्कम अशी बाजू न्यायालयात सादर केली जावी यासह आरक्षण यासंदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
भंडारा येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, शहराध्यक्ष संजय कुंभलकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष विनोद बांते, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष कोमल गभने, अरविंद भालाधरे, मुकेश थानथराटे, नितिन कडव, विकास मदनकर, कृष्णकुमार बतरा, शेरु भूरे,हेमंत बांडेबूचे, महेंद्र निम्बार्ते, नगरसेवक रूबी चड्डा, कैलास तांडेकर, आशु गोंडाने, मिलिंद मदनकर, पप्पू भोपे, अजीज शेख, मधुरा मदनकर,वनिता कुथे, शमीमा शेख, गीता सिडाम, वर्षा साकुरे, माला बगमारे, रोशनी पडोळे, स्नेहा श्रावनकर, प्रिती गोसेवाडे यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
पवनी शहर आणि तालुका भाजपाच्या वतीने येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह, विलास काटेखाये, डाॅ.उल्हास हरडे, अनिल मेंढे, तालुकाध्यक्ष मोहन सुरकर यांनी संबोधित केले. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे ही वेळ ओबीसींवर आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनात राजेंद्र फुलबांधे, मच्छिंद्र हटवार, माधुरी नखाते,अनुराधा बुराडे, प्रकाश कुर्झेकर, हिरालाल वैद्य,शरद देवाळे, सीमा मोहिते, अमोल उराडे, सुरेंद्र आयतुलवार, मयुर रेवतकर, मोहन घोगरे,श्रीराम गाडेकर, पुरुषोत्तम गाडेकर, शिवाजी मुंगाटे,सुरेश अवसरे, राजु चोपकर,निर्मला तलमले, कविता कुळमुते, दुर्गा शिवरकर, रिना चोपकर, राहूल खोबरागडे, दिनेश कोरे, खेमराज जिभकाटे, विलास डहारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.