गोंदिया जिल्ह्यात भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाएैवजी निवेदन

0
43

गोंदिया,दि.15ः-: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या.जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज ओबीसीवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती.पण या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटा दिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणले,या विरोधात भाजपच्यावतीने आज गोंदिया जिल्ह्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.मात्र जिल्ह्यातील एकाही तालुक्यात आंदोलन करण्याएैवजी भाजप नेत्यांनी तहसिलदार व उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देत सोपस्कार पार पाडले.

गोंदियात माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, दवनीवाडा मंडल अध्यक्ष धनेंद्र अटरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, अशोक हरिणखेडे, मनोज मेंढे, देवचंद नागपुरे, गजेंद्र फुंडे, योगराज रहांगडाले, बाबा बिसेन, मनोज पटनायक, सोनू कुथे, गोल्डी गावंडे, शैलेश तूरकर, आत्माराम दसरे, संजय गौतम, संतोषकुमार गौर, रतनलाल बघेले, देवलाल पटले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
देवरी – नुकतेच महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे. या विरोधात 15 सप्टेंबरला देवरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देवरी तहसिलदार मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, सचिव यादवराव पंचमवार, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव नाईक, तालुकाध्यक्ष अनिलकुमार येरणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष छोटू भाटिया, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र रहांगडाले, तालुका महामंत्री योगेश ब्राह्मणकर, गजानन शिवणकर, प्रेमलाल मुंगणकर, महिला शहर अध्यक्षा माया निर्वाण, ओबीसी महिला आघाडी तालुकाध्यक्षा रचना उजवने, तनुजा भेलावे, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष पियुष दखने महामंत्री देवेंद्र गायधने, हितेश हटवार, धिरज तिरपुडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सडक अर्जुनीः- माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात सडक अर्जुनी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक लंजे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे,ओबीसी आघाडीचे जिल्हा सचिव राजेश कठाणे,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.भुमेश्वर पटले,ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विलास चौव्हाण,लक्ष्मीकांत धानगाये,तालुका महामंत्री गिरधारी हत्तीमारे,महामंत्री शिशिर येळे,युवा मोर्चा प्रभारी गौरेश बावनकर,किसान आघाडी तालुकाध्यक्ष प्रल्हाद कोरे,माजी जि.प. सदस्य रुपाली टेंभुर्णे,विश्वनाथ रंहागडाले,ओमकार टेंभुर्णे,किशोर डोंगरवार,महेश नागापुरे,पुरुषोत्तम मेश्राम,जागेश्वर पटोले,तुलाराम येरणे,आदींसह भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

आमगाव : येथे माजी आमदार भेरसींग नागपुरे, प्रदेश सचिव माजी आमदार संजय पुराम, तालुका अध्यक्ष काशीराम हूकरे, महामंत्री नरेंद्र वाजपेयी, राजु पटले, राकेश शेंडे, माजी पस सभापती हरिहर मानकर अनीरुद शेंडे, यशवंत मानकर, निमेश दमाहे, मनोज सोमवंशी, लक्षमन चुटे, सुषमा भुजाळे, सुनंदा ऊके, अंजली जाभुळकर, संगीता वाटकर, रमेश चुटे, गोपाल हनवते, यशवंत पुंड, राजेंद्र गौतम आदी कार्यकर्ते उपस्थित होते,