नवेगाव येथे अतिसाराने एकाचा मृत्यू; अनेक जण आजारी

0
75

मोहाडी-तालुक्यातील नवेगाव बु येथे दुषित पाण्यामुळे अतिसाराच्या आजाराने पाय पसरवले आहेत. दरम्यान नावेगाव येथील डेव्हिड चमलाटे यांचा यामुळे मृत्यू झाला असून गावातील अनेक नागरिक या आजाराने ग्रस्त आहेत. नवेगाव येथील टोली ग्रा.प परिसरात असलेली बोरवेल तसेच विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याने पिण्याचे शुध्दीकरण होत नाही. बोरवेल जवळ गुरे बांधली जातात.
त्यामुळे परिसरात घाण वाढतच आहे. ग्रा.प अंतर्गत गावातील नाल्या, गटारे वेळोवेळी स्वच्छ केले जात नाहीत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध हजार पुढे येत असून सध्या अधिकारामुळे अनेक जण त्रस्त आहेत. यातच डेविड चमलाटे वय 17 वर्ष या तरुणाचा १२ सप्टेंबरला मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. गावातील बरेच नागरिक आजारी आहेत. आजारी रुग्णांना वेळीच आरोग्य सुविधा मिळाव्यात आरोग्य प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.